पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... तर नरेंद्र मोदी यांनी देशहिताला धोका दिला - राहुल गांधी

राहुल गांधी

काश्मीरच्या प्रश्नावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भेटीवेळी केलेल्या वक्तव्यावरून मंगळवारी भारतातील राजकारण तापले. आता याच मुद्द्यावरून काँग्रेसचे मावळते अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. जर नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे काश्मीर प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी मध्यस्थी करण्याची मागणी केली असेल, तर त्यांनी देशहिताला आणि १९७२ च्या शिमला कराराला धोका दिला आहे, असे सांगणारे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

आज या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी राज्यसभेत निवेदन करून नरेंद्र मोदी हे डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी असे काहीही बोललेले नसल्याचे सांगितले. त्याचबरोबर ट्रम्प प्रशासनानेही या मुद्द्यावर स्पष्टीकरण करताना काश्मीरचा प्रश्न हा द्विपक्षीय चर्चेतूनच सोडवला जाऊ शकतो, असे स्पष्ट केले.

पंतप्रधानांनी ट्रम्प यांना विनंती केली नाही, जयशंकर यांचे स्पष्टीकरण

या सर्व पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विट करून मंगळवारी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. परराष्ट्र मंत्र्यांनी या संदर्भात केलेले निवेदन आम्हाला मान्य नाही. पंतप्रधानांनी स्वतः या संदर्भात काय घडले होते, हे संसेदत सांगितले पाहिजे, असे राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:PM must tell the nation what transpired in meeting Rahul Gandhi on Donald Trumps Kashmir mediation claim