पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रणाम लतादिदी, मैं मोदी बोल रहा हूं..

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लता मंगेशकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या रेडिओवरील कार्यक्रमात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याशी झालेली खास चर्चा शेअर केली. पंतप्रधान मोदींनी अमेरिकेला रवाना होण्यापूर्वीच लता मंगेशकर यांना फोन करुन जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यांनी लता मंगेशकर यांच्याशी झालेल्या चर्चेचा अनुभव शेअर करत हा एका लहान भाऊ आणि मोठ्या बहिणीत झालेला प्रेमळ संवाद असल्याचे म्हटले. 

लतादिदींबरोबर बोलण्याचा अनुभव असा आहे की, जसा छोटा भाऊ आणि मोठ्या बहिणीतील प्रेम. आजच्या मन की बातमध्ये देशातील एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे. आपण सर्व देशवासियांना त्यांच्या प्रती खूप सन्मान आणि प्रेम आहे. त्या आपल्यापेक्षा वयाने खूप मोठ्या आहेत आणि आपण त्यांना लतादिदी म्हणतो. लतादिदी २८ सप्टेंबरला ९० वर्षांच्या झाल्या. अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी मी त्यांना फोनवर जन्मदिवसाच्या आधीच शुभेच्छा दिल्या. 

मन की बातः लतादिदी आणि रशियन खेळाडूबाबत काय म्हणाले PM मोदी

ते पुढे म्हणाले की, लतादिदींच्या आई या गुजराती होत्या, याचा मला खूप आनंद आहे, आणि जेव्हा-जेव्हा मला लतादिदींना भेटण्याचा योग आला तेव्हा त्यांनी मला कोणता ना कोणता गुजराती पदार्थ खाऊ घातला. यावेळी लता मंगेशकर यांनी पुढील भेटीवेळी पुन्हा एकदा गुजराती पदार्थ खाऊ घालण्याचा शब्द दिला. 

मोदींनी लता मंगेशकर यांना आशीर्वाद देण्यास सांगितले. त्यावेळी लता मंगेशकर यांनी त्यांनी देशाच्या विकासासाठी आणखी काम करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. भारताच्या प्रगतीसाठी ज्या पद्धतीने मोदी काम करत आहेत. त्याचा प्रभाव संपूर्ण जगावर पडल्याचे दिसत असल्याचेही त्या म्हणाल्या. वयाने मोठे असल्याने काही होत नसते. ज्याचे काम मोठे असते, तो मोठा असतो. तुम्ही देशासाठी निरंतर काम केले आहे. देशाचे नाव आणि गौरव वाढवले आहे. तुम्ही पुढेही असेच काम करावे, अशा शुभेच्छा मी देते, असेही त्यांनी म्हटले.