पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अटलजींच्या २५ फूट उंच अन् ५ टन वजनी पुतळ्याचे PM मोदींकडून अनावरण

मोदींच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी लखनऊ येथे माजी आणि दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी मोदींनी दिल्लीतील अटल भूजल योजनेविषयीची सविस्तर माहितीही आपल्या भाषणातून दिली. या योजनेच्या माध्यमातून उत्तर प्रदेशसह देशातील सात राज्यात पाण्याच्या क्षेत्रात सुधारणा करण्याच्या दृष्टिने प्रयत्न केला जाईल, असे मोदी यांनी म्हटले आहे.

 अटल भूजल योजनेचा शुभारंभ! PM मोदी म्हणाले,... 

पंतप्रधानांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विमान तळापासून ते लोकभवन परिसरापर्यंत नाक्या नाक्यावर पोलिस तैनात होते. अटल बिहारी वाजपेयी यांची २५ फूट उंचीचा पुतळा तांब्याच्या धातूपासून तयार करण्यात आला असून त्याचे वजन जवळपास ५ टन इतके आहे. हा पुतळा साकारण्याचे काम जयपूरमधील एका कंपनीकडे देण्यात आले होते. यासाठी जवळपास ८९ लाख रुपये इतका खर्च आला आहे. 

सचिनच्या सुरक्षेत कपात, आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ

अटलजींच्या आठवणींना उजाळा देताना मोदी म्हणाले की, त्यांचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा फारच वेगळा होता. जीवन तुकड्यामध्ये नाही तर परिपूर्णतेच्या दृष्टिने जगायला हवे, असे ते सांगायचे. भाजप सरकार त्यांचा विचाराप्रमाणेच चालते आणि चालत राहिलं, असेही मोदींनी यावेळी सांगितले. 

पवार साहेब चमत्कारी असल्याचे सांगत CM ठाकरेंचा भाजपला टोला

या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याच्या विरोधात हिंसक आंदोलनावरही भाष्य केले. आंदोलनाला हिंसक वळण देणाऱ्यांनी आपण स्वीकारलेला मार्ग योग्य आहे का? असा प्रश्न स्वत:ला विचारायला हवा. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करुन आपण आपल्या पुढच्या पिढीच्या अडचणी वाढवण्याचे काम करत आहोत. याचा विचार करुन देशात शांतता राखावी, असे आवाहन मोदींनी यावेळी केले आहे.