पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या योजनांवर काम करा : नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा  देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रभाव होऊ नये, यासाठी आता केंद्र सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून केंद्रीय मंत्र्यांशी संवाद साधला. आपापल्या मंत्रालयाच्यावतीने अर्थिक प्रभाव कमी करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु करा, अशा सूचना मोदींनी आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना दिल्या आहेत. 

 

 

'तबलिगी समाजातील २५,५०० लोक विलगीकरण कक्षात'

चीनच्या वुहानमधून देशात शिरकाव केलेल्या कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेले संकट हे 'मेक इन इंडिया'चा नारा पुढे घेऊन जाण्याची संधी म्हणून पाहावे. अन्य राष्ट्रांवर अवलंबून न राहता स्वदेशी उत्पनावर भर देऊन आपण या संकटातून सावरु शकतो. यासंदर्भातील योजनेवर युद्ध पातळीवर प्रयत्न करा, असे मोदींनी म्हटले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मंत्रिमंडळाशी संवाद साधताना मोदी म्हणाले की, प्रत्येक मंत्रालयाने दहा प्रमुख निर्णय आणि क्षेत्रातील प्राधान्याने कराव्या लागतील अशा दहा गोष्टीवर विशेष भर द्यायला हवा. दुसऱ्या देशावर अवलंबून न राहता स्वदेशीला चालना देणारा हा काळ आहे, असेही मोदींनी यावेळी सांगितले. केंद्रीय मंत्र्यांनी राज्य आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात रहावे, असा आदेशही मोदींनी दिलाय.

२४ तासांत कोरोनामुळे देशात २८ जणांचा मृत्यू, ७०४ नवे रुग्ण

जगभरात वेगाने संक्रमण होणाऱ्या कोरोना विषाणूने भारताची डोकेदुखी वाढली आहे. देशात आतापर्यंत चार हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. दिवसागणिक हा आकडा वाढत असून कोरोना विषाणूचे संक्रमण दूर करण्यासाठी देशात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आलाय. परिणामी देशात अनेक उद्योग ठप्प झाले असून अर्थव्यवस्थेची घडी विस्कळीत झाली आहे. कोरोनाच्या संकटासोबतच भारतासमोर अर्थिक संकट घोंगावताना दिसतय. मोदी सरकारला हे आव्हानही पेलावे लागणार आहे. 
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:PM Modi told cabinet ministers prepare a detailed plan on a war footing to prevent the economic impact of Covid19