पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सुप्रीम कोर्टच्या आदेशाची गरज नाही, राम मंदिरांची उभारणी सुरु करा- सुब्रमण्यम स्वामी

भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी

नरेंद्र मोदी सरकारचा दुसरा कार्यकाळ सुरु होताच राम मंदिर निर्मितीसारख्या दीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मुद्द्यांबाबत लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातच आता भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून राम मंदिराची लवकरात लवकर उभारणी करण्याचे आवाहन केले आहे. स्वामी यांनी यासंबंधी टि्वट करुन माहिती दिली. 

त्यांनी म्हटले की, पंतप्रधानांना लिहिलेल्या एका पत्रात मी सरकारला सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीची गरज नसल्याचे म्हटले आहे. त्यांना चुकीचा कायदेशीर सल्ला मिळाला आहे. नरसिंह राव सरकारने या जमिनीचे राष्ट्रीयीकरण केले होते आणि अनुच्छेद ३०० अ अंतर्गत सर्वोच्च न्यायालय याबाबत प्रश्न उपस्थित करु शकत नाही. ते फक्त भरपाई निश्चित करु शकतात. त्यामुळे आतापासूनच मंदिर निर्मितीचे काम करण्यास सरकारसमोर कोणतीच अडचण नाही.

RSS प्रमुख भागवत म्हणाले, राम का काम करना है !

पंतप्रधानांना लिहिलेल्या चार पानी पत्रात सुब्रमण्यम स्वामी यांनी रामसेतूला प्राचीन स्मारक आणि पुरात्तव स्थळ तसेच अवशेष अधिनियम, १९५८ अंतर्गत राष्ट्रीय पौराणिक स्मारक म्हणून मान्यता देण्याचे अपील केले आहे. 

ते पुढे म्हणाले, दुसरा महत्वाचा मुद्दा हा राम मंदिर निर्मितीचा आहे. त्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयाला अविवादित जमीन परत करण्याची मागणी केली आहे. कारण, त्याठिकाणी राम मंदिराच्या उभारणीचे कार्य सुरु होईल. सॉलिसिटर जनरलची याबाबतची याचिका चुकीची आहे. सरकारला आपल्या मालकीची जमीन सर्वोच्च न्यायालयाला मागण्यात काहीच अडचण नाही. 

राम जन्मभूमीप्रकरणी मध्यस्थी समितीला सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही राम मंदिराचा मुद्दा आळवला होता. 'रामाचे काम करायचे आहे, आणि रामाचे काम होणारच. रामाचे काम करणे म्हणजे आपले काम करणे आहे. आपले काम आपण स्वतः केले तर ते चांगले असते. दुसऱ्याकडे दिले तर कोणाची तरी निगराणी करण्यासारखे असते,' असे त्यांनी म्हटले होते.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:pm modi to start construction of ram temple at once without sc permission bjp leader subramanian swamy asks