पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पंतप्रधान मोदी २६ एप्रिलला 'मन की बात'मधून साधणार जनतेशी संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 'मन की बात'मधून २६ एप्रिलला पुन्हा एकदा देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. ऑल इंडिया रेडिओनं ट्विट करत ही माहिती दिली. देशात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केली होती. लॉकडाऊनचा कालावधी हा  १४ एप्रिलला संपला त्यानंतर  हा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. जर प्रत्येकानं नियमांचं काटेकोरपणे पालन केलं तर काही ठिकाणी २० एप्रिलनंतर सूट देण्यात येईल असंही पंतप्रधानांनी सांगितलं.

कोरोना विषाणूः डोनाल्ड ट्रम्प यांनी डब्ल्यूएचओचा निधी रोखला

कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी टोल फ्री क्रमांकावरुन लोकांकडून सल्ले आणि काही कल्पनाही मागवण्यात आल्या आहेत. यापूर्वी २९ मार्चला पंतप्रधानांनी मन की बातमधून देशवासीयांशी संवाद साधला होता. या संवादाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी देशवासीयांची माफीही मागितली होती.

'काही निर्णयांमुळे गरीब लोकांना कठीण प्रसंगाचा सामना करावा लागत आहे, म्हणूनच मी त्यांची माफी  मागत आहे,  मी तुमच्या समस्या जाणतो, मात्र कोरोनाशी लढण्याकरता  दुसरा कोणताही रस्ता तूर्त नाही. ही जीवन मृत्यूची लढाई आहे. त्यामुळे देशासाठी, देशवासीयांसाठी कठोर निर्णय घ्यावे लागतात, असं ते म्हणाले होते.

सुदैवानं महाराष्ट्रातील या सात जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव नाही