पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PM मोदींच्या त्या ट्विटवर इवांका यांची भन्नाट प्रतिक्रिया

इवांका ट्रम्प

सध्याच्या घडीला जगभरात कोरोना विषाणूची दहशत, त्याचे वाढते संक्रमण आणि त्याला रोखण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्न याचीच चर्चा सुरु आहे. जागतिक संकटावर मात करण्यासाठी अनेक राष्ट्रांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. बाहेरचे संकट टाळण्यासाठी घरात बसून काय करावे? असा मोठा प्रश्न अनेकांना सतावताना दिसत आहे. 

मोदींच्या आई हिराबेन यांनीही लावला 'PM केअर्स फंड'साठी हातभार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावरही उपाय सांगितला आहे. नागरिकांना तणाव मुक्तीसाठी योग साधना करावी, असे मोदींनी सूचवले आहे. यासाठी त्यांनी इंग्रजी आणि हिंदी भाषेतील योग निद्रा व्हिडिओ ट्विटरच्या माध्यमातून शेअर केलाय.  ट्विटच्या माध्यमातून व्हिडिओ शेअर करताना मोदींनी लिहिलंय की, जेव्हा मला वेळ मिळतो तेव्हा आठवड्यातून एक ते दोनवेळा योग निद्रा आवर्जून करतो. यामध्ये शरीर स्वस्थ आणि मन प्रसन्न राहण्यास मदत होतेच शिवाय तणाव आणि चिंता दूर होते, असा उल्लेख ट्विटमध्ये करण्यात आला आहे.  

लोकांनी सहकार्य न केल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला: आरोग्य मंत्रालय

मोदी यांनी शेअर केलेल्या व्हिडिओवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इवांका यांनी मोदींनी शेअर केलेला व्हिडिओ अभूतपूर्व असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर उत्तम माहिती दिल्याबद्दल मोदींचे आभारही मानले आहेत. इवांका या सोशल मीडियावर चांगल्याच सक्रीय आहेत. नुकत्याच त्या भारत दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी आग्रा येथील ताजमहल या वास्तूचे कौतुक केले होते. एवढेच नाही तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मिम्सवरही त्यांनी प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळाले होते.