पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विकास आणि रोजगार वृद्धीसाठी पंतप्रधानांकडून दोन नवे मंत्रिगट

अमित शहा आणि नरेंद्र मोदी

अर्थव्यवस्थेतील मंदी आणि वाढती बेरोजगारी यावर मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दोन मंत्रिगटांची स्थापना केली. दोन्ही मंत्रिगटांचे अध्यक्षपद नरेंद्र मोदी यांच्याकडे असणार आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, रोजगार निर्मितीसाठी कोणते उपाय योजले गेले पाहिजेत, यावर या मंत्रिगटात चर्चा होईल आणि निर्णय घेतले जातील.

प्रयोग दरवेळी यशस्वी होतातच असे नाही - अखिलेश यादव

गुंतवणूक आणि आर्थिक विकास यासाठी तयार करण्यात आलेल्या पाच सदस्यांच्या मंत्रिगटामध्ये गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, रस्ते वाहतूक आणि लहान व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे मंत्री पियुष गोयल यांचा समावेश आहे. 

रोजगार निर्मिती आणि कौशलविकास यासाठी तयार करण्यात आलेल्या दहा सदस्यांच्या मंत्रिगटात अमित शहा, निर्मला सीतारामन, पियुष गोयल यांच्यासोबत कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर, मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, कौशल विकास मंत्री महेंद्रनाथ पांडे, कामगार मंत्री संतोषकुमार गंगवार, गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंग पुरी यांचा समावेश आहे.

वर्ल्ड कपसह मनंही जिंका, मोदींचा विराट ब्रिगेडला संदेश

अर्थव्यवस्थेतील मंदी घालवणे हे सध्याच्या केंद्र सरकारपुढील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये एकू देशांतर्गत उत्पादन दर GDP ५.८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. गेल्या संपूर्ण आर्थिक वर्षाचा जीडीपी सुद्धा ६.८ टक्के इतकाच असेल, असे अनुमान आहे. आधीच्या अनुमानानुसार जीडीपी ७.२ टक्के असण्याची शक्यता होती. पण त्यातही घसरण होणार असल्याचे दिसते.