पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'आर्थिक विषयांवरील चर्चा केंद्रस्थानी राहावी'

नरेंद्र मोदी

आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल झाले आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना मोदींनी सांगितले की, आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न राहिल. तसंच, या अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रामुख्याने आर्थिक विषयांवर लक्ष केंद्रित केले जाईल, असे मोदींनी सांगितले.

CAAविरोधात संसद परिसरात विरोधकांचे आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, नव्या दशकातलं पहिले अधिवेशन आहे. आपली आर्थिक स्थिती मजबूत करण्यचा प्रयत्न राहिल. तसंच, दोन्ही सभागृहात चांगली चर्चा व्हावी, दिवसेंदिवस आपल्या चर्चाचा स्थर चांगला होत जावा, असे मोदींनी सांगितले. तसंच, आर्थिक विषयांवरील चर्चा केंद्रस्थानी रहावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. 

ओलीस ठेवलेल्या आरोपीच्या पत्नीला जमावाकडून जबर

दरम्यान, संसदेचे अर्थसंकल्पिय अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल. आर्थिक मंदी दरम्यान हा अर्थसंकल्प मांडण्यात येणार असल्याने महत्वाचा मानला जात आहे. 

जम्मूमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा, ट्रकमधून निघाले होते श्रीनगरकडे