पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशासाठी साहसी निर्णय घ्यावे लागतातः पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) देशभर सुरु असलेल्या हिंसक आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा साहसी निर्णय असल्याचे सूचकपणे सांगितले आहे. असोचेमच्या एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशाला संकटातून बाहेर काढण्याचे आपले अभियान सुरुच राहणार आहे. पण हे सर्व सोप्पे नसते. यासाठी खूप काही सहन करावे लागते, परंतु, देशासाठी हे करावेच लागते. 

दिल्लीच्या विज्ञान भवनात असोचेमच्या वार्षिक परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, देशाला संकटातून मुक्त करताना अनेक लोकांचा राग आणि आरोप सहन करावा लागतो. पण तरीही हे देशासाठी करावे लागते. ७० वर्षांची सवय बदलण्यासाठी वेळ लागतो आणि देशासाठी हे करावे लागते.

'इटलीवरुन आलेल्यांना नागरिकत्व मिळते मग बांगलादेशींना का नाही?'

पंतप्रधान मोदींनी सुधारित नागरिकत्व कायद्याचे थेट नाव न घेता, सूचकरित्या आपले म्हणणे मांडले. त्यांनी म्हटले की, त्यांचे सरकार प्रत्येक वर्गातील लोकांचे म्हणणे ऐकून घेते. आज देशात असे सरकार आहे, जे शेतकऱ्यांचे ऐकते, मजूरांचे ऐकते, व्यापाऱ्यांचेही ऐकते, उद्योग जगतालाही ऐकते. त्यांच्या गरजा समजावून घेण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांच्या सूचनांवर काम केले जाते.

कर्जमाफीची प्रक्रिया दोन-तीन महिन्यात पूर्ण करणार: अजित पवार