पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रचंड दबाव तरीही सीएए, ३७० च्या निर्णयावर ठामः मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

सीएएवरुन सुरु असलेले राजकारण आणि शाहिन बागसह देशातील विविध भागात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही परिस्थितीत या निर्णयावर फेरविचार केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर आपल्या वाराणसी मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेल्या मोदींनी १२०० कोटी रुपयांच्या विकासकामांची भेट दिली. ते म्हणाले की, हे निर्णय (सीएए, कलम ३७०) आवश्यक होते. मोठ्या दबावानंतरही आम्ही हे निर्णय घेतले. मी तुम्हाला विश्वास देतो की, आम्ही या निर्णयावर यापुढेही ठाम राहणार आहोत. 

...नाहीतर पंतप्रधान मोदींची माफी मागाः फडणवीस

सीएएचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, महाकालच्या आशीर्वादामुळे आम्ही हे सर्व निर्णय घेण्यास सक्षम झालो. गेल्या अनेक काळांपासून हे निर्णय प्रलंबित होते. कलम ३७० असो किंवा सीएए, आम्ही मोठा दबाव असतानाही असे निर्णय घेतले. 

राम मंदिरचा उल्लेख करताना मोदी म्हणाले की, राम मंदिरचा विषय दशकांपासून न्यायालयात होता. आता मंदिर निर्मितीचा रस्ता मोकळा झाला आहे. सरकारने ट्रस्ट निर्मितीची घोषणा केली आहे. ही समिती मंदिर निर्मितीचे काम पाहिल. अयोध्यामध्ये राम मंदिरशी निगडीत आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ६७ एकर अधिग्रहित जमीनही ट्रस्टला हस्तांतरित केली जाईल. लवकरच अयोध्यात भव्य आणि द्वय राम मंदिर उभारले जाईल. 

सेनेनं सर्व तत्वं गुंडाळून मातोश्रीच्या कोपऱ्यात ठेवली:चंद्रकांत पाटील

दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर दुसऱ्यांदा वाराणसी येथे आलेले नरेंद्र मोदी हे शैव समाजाशी निगडीत जंगमवाडी मठाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी चंदोली येथील पंडित दिनदयाल उपाध्याय यांच्या ६३ फूट उंच प्रतिमेचे अनावरण केले. मोदींनी वाराणसी येथे सुमारे १२०० कोटी रुपयांच्या योजनांचे लोकार्पण आणि शिलान्यास केला. त्यांनी काशी येथून महाकालेश्वर आणि ओंकारेश्वरला जोडणाऱ्या काशी-महाकाल एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला.