पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींचा राजीनामा स्वीकारला

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर शुक्रवारी बोलवलेल्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकार केला असून नवे  सरकार स्थापन होईपर्यंत पदावर कार्यरत रहावे,  अशी विनंती त्यांनी मोदींना केली आहे.१६ व्या लोकसभेचा कार्यकाळ ३ जून रोजी समाप्त होणार आहे.

मोदी सरकारकडून १६ वी लोकसभा भंग करण्याची शिफारस

आज (शुक्रवारी) केंद्रीय कॅबिनेटने १६ वी लोकसभा विसर्जित करण्याची शिफारस केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सांयकाळी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत यासंबंधीचा प्रस्ताव संमत करण्यात आला होता. प्रकृती अस्वास्थामुळे अरुण जेटली या बैठकीत सहभागी झाले नव्हते.  

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या घटक पक्षांनी दमदार कामगिरी करत आपला २०१४ चा विक्रम मोडत नवा सर्वाधिक जागा जिंकण्याचा पराक्रम करुन दाखवला.

हा गोडसेंच्या विचारांचा विजय, पराभवानंतर दिग्गीराजांची प्रतिक्रिया