पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाशी लढा: PM मोदींनी दिला युवी-कैफच्या खेळीचा दाखला

कैफ-युवी (संग्रहित छायाचित्र)

कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून 'जनता कर्फ्यू' ही नवी संकल्पना उदयास आणली. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी भारतवासियांनी रविवारी २२ मार्च रोजी घराबाहेर पडू नये, असे आवाहन मोदींनी केले होते. त्यानंतर माजी क्रिकेटर युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ यांनी देखील मोदींच्या संकल्पनेला साथ देऊन कोरोना लढ्यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन देशवासियांना केले आहे. यावर मोदींनी प्रतिक्रिया दिली आहे.  

कोरोनामुळे दहावीचा अखेरचा पेपर लांबणीवर!

युवी आणि कैफ हे उत्कृष्ट क्रिकेटर्सपैकी एक होते. या दोघांनी केलेली अविस्मरणीय भागीदारीप्रमाणेच आपल्याला कोरोनाविरोधात भागीदारी रचायची आहे, अशा आशयाचे ट्विट मोदींनी केले आहे. इंग्लंड विरुद्धच्या नेटवेस्ट मालिकेतील युवी-कैफच्या खेळीचा दाखला देत मोदींनी या जोडीचे कौतुक केले आहे. या जोडीने ज्याप्रमाणे संघाला संकटातून बाहेर काढले तसेच आपल्याला सर्वांना मिळून कोरोनाविरोधात लढा द्यायचा आहे, असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.  

कोरोनाबाधित कनिकाच्या संपर्कातील ४५ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह

२००२ मध्ये नेटवेस्ट मालिकेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडने भारतासमोर ३२6 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या सामन्यात भारतीय संघाची  अवस्था १४६/५ अशी असताना युवराज-कैफ जोडीने संघर्षमय खेळी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. या जोडीने केलेल्या १२१ धावांच्या जोरावर भारताने रोमहर्षक विजय मिळवला होती. युवी ६९ धावांवर बाद झाल्यानंतर कैफने भारताला विजय मिळवून दिला होता.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:PM Modi refers to Mohammed Kaif and Yuvraj Singh iconic Natwest Final partnership in appeal to people to fight against coronavirus