पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राहुल गांधींच्या त्या वक्तव्याला आसाममध्येही मोदींकडून प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी

राहुल गांधींच्या त्या विधानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील कोक्राझारमधील कार्यक्रमात शुक्रवारी पुन्हा उल्लेख केला. नरेंद्र मोदी म्हणाले, कधी कधी लोक मला दांडक्याने मारण्याचे सांगतात. पण ज्या मोदींना एवढ्या मोठ्या प्रमाणात माता-भगिनींचे सुरक्षाकवच मिळाले आहे. त्यांना कोणीही दांडक्याने फटके मारले तरी काहीही होणार नाही. 

वांद्र्यातील घुसखोरांचे मोहल्ले आधी साफ करा, मनसेची पोस्टरबाजी

आसाममध्ये बोडो करारावरील स्वाक्षरीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना त्यांनी नाव न घेता राहुल गांधींच्या विधानाचा वापर करून घेतला. 

देशातील बेरोजगार तरूण सहा महिन्यांनी नरेंद्र मोदींच्या पाठीत दांडक्यांनी मारतील, अशा स्वरुपाचे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते. त्याचा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना केला. काल नरेंद्र मोदी म्हणाले होते की, काही लोक मला बेरोजगारीच्या मुद्द्यावरून पाठीवर दांडक्याने मारण्याचे बोलताहेत. मी रोज सूर्यनमस्कार घालतो. आता मी रोज जास्त सूर्यनमस्कार घालेन. जणेकरून माझी पाठ आणखी मजबूत होईल.

काहीतरी गडबड आहे, शाहिन बाग प्रकरणात सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी

बोडो चळवळीतून मुख्य प्रवाहात आलेल्या सर्वांचे मी स्वागत करतो. देशाच्या ईशान्य भागात पुढील काळात कधीही हिंसाचार होऊ नये, यासाठी आमचे सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करेल, असेही नरेंद्र मोदींनी शुक्रवारी सांगितले.