पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशवासियांच्या स्वप्नातील भारत निर्माण करु : PM मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

 
लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवारी) गुजरातमधील खानपूरमधील जेपी चौकातील भाजप कार्यालयातील आयोजित कार्यक्रमात गुजरातच्या जनतेशी संवाद साधला. सुरतमध्ये घडलेल्या अग्नितांडवात मृत विद्यार्थ्यांना श्रंद्धांजली अर्पित करुन मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. गुजरातच्या जनतेचा आशीर्वाद माझ्यासाठी नेहमीच खास असतो, अशा शब्दांत त्यांनी गुजरातच्या जनतेचे आभार मानले. गुजरातमध्ये भाजपने २६ पैकी २६ जागा जिंकल्या आहेत.  

गुजरातच्या जनतेने मला खूप प्रेम दिले आहे. ते मी शब्दांत व्यक्त करु शकत नाही. २०१४ मध्ये देशाला गुजरातच्या विकासाचे मॉडेल समजले. गुजरातमधून दिल्लीच्या दरबारात गेलो असलो तरी तुम्ही दिलेले संस्कार विसरलेलो नाही, असेही मोदी यावेळी म्हणाले. जबाबदारीने कार्य करत जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ करुन दाखवत देशवासियांच्या स्वप्नातील भारत निर्माण करु, अशा शब्दांत त्यांनी जनतेला एक विश्वस्त आश्वासन दिले.

लोकसभेतील घवघवीत यशानंतर अहमदाबाद विमानतळावर उतरल्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा आणि गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी मोदींचे स्वागत केले. सुरतमधील अग्नीकांडाच्या घटनेमुळे मोदींचे स्वागत हे अगदी साध्यापद्धतीने करण्यात आले. त्यानंतर मोदींनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी अहमदाबादच्या कार्यालयाला भेट देत जनतेशी संवाद साधला.   

गुजरातमध्ये मोदींचे जंगी स्वागत करण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र सुरतमधील घटनेनंतर जल्लोषी स्वागत करण्याऐवजी शांततेतच कार्यक्रम पार पडला.