पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जाधव यांना न्याय मिळेल, ICJ च्या निकालानंतर मोदींची प्रतिक्रिया

पंतप्रधान नरेंद्र मोदी

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात दिलेल्या निकालाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केले आहे. आयजेसीने दिलेला निकाल हा सत्य आणि न्यायाचा विजय असल्याचे मोदींनी म्हटले आहे. पाठपुराव्याच्या आधारावर योग्य निर्णय दिल्याबद्दल मोदींनी आंतरराष्ट्रीय न्यायालयाला शुभेच्छा देखील दिल्या आहेत. याशिवाय मोदींनी कुलभूषण जाधव यांना न्याय मिळेल, असा विश्वासही ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. 

kulbhushan jadhav verdict : शिक्षेचा फेरविचार करा, ICJ चे पाकला आदेश

मोदींनी ट्विटमध्ये लिहलंय की, "आयजेसीने कुलभूषण जाधव प्रकरणातील निकाल स्वागतार्ह आहे. सत्य आणि न्यायाचा विजय झाला. पुराव्यांच्या आधारावर आजेसीने निर्णय घेतला. जाधव यांना नक्की न्याय मिळेल. सरकार नेहमीच भारतवासियांची सुरक्षा आणि कल्याणासाठी कार्य करत राहिल."

Kulbhushan Verdict : हा भारताचा विजय, निकालाचं नेत्यांकडून स्वागत

पाकिस्तानी लष्कराने भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली होती. पाकिस्तानच्या या निर्णयाविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका दाखल करुन दाद मागितली होती. बुधवारी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने १५-१ असा भारताच्या बाजूने निकाल देत कुलभूषण यांच्या फाशीच्या शिक्षेसंदर्भातील स्थगिती कायम ठेवली आहे. याशिवाय त्यांना कायदेशीर मदत देण्याबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आदेश दिले आहेत. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: PM Modi on Kulbhushan Jadhav verdict We welcome todays verdict in the ICJ Im sure Jadhav will get justice