पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

प्रचाराची रणधुमाळी संपल्यानंतर मोदी केदारनाथांच्या चरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (ANI Photo)

देशात लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबला आहे. रविवारी शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (शनिवार) उत्तराखंडच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. सकाळी साडेनऊ वाजता पंतप्रधान मोदी हे केदारनाथला पोहोचले. तिथे त्यांनी पूजा केल्यानंतर रुद्राभिषेक केला. पंतप्रधान हे आज केदारनाथलाच मुक्काम करणार आहेत. उद्या ते बद्रीनाथला जाणार आहेत. तर दुसरीकडे भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनीही सोमनाथांचे दर्शन घेतले.

विशेष हेलिकॉप्टरने आलेल्या मोदींनी खास गढवाली पोशाख परिधान केला होता. यावेळी ते काठीच्या आधाराने चालताना दिसले. हेलिपॅड ते मंदिरापर्यंत चालत जाताना त्यांनी भाविकांना हात उंचावत अभिवादन केले. 

केदारनाथ मंदिरात पूजा केल्यानंतर मोदींनी केदारपुरी येथे सुरु असलेल्या पुनर्निर्माण कार्यांचा आढावा घेतला. केदारनाथ धाम येथील गुफेत मोदी आज ध्यान करतील. मागील दोन वर्षांत केदारनाथला येण्याची मोदींची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी ते ३ मे २०१७ मध्येही केदारनाथला आले होते. दरवाजे उघडल्यानंतर मोदींनी बाबा केदार यांचे दर्शन करुन रुद्राभिषेक केला होता. मोदींच्या दौऱ्यामुळे येथे कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.