पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनामुळे होळी मिलन कार्यक्रमात सहभागी न होण्याचा मोदींचा निर्णय

नरेंद्र मोदी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात होत असलेल्या होळीच्या कार्यक्रमात सार्वजनिकपणे सहभागी न होण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. होळी मिलन कार्यक्रमात यंदा मोदी सहभागी होणार नाहीत. खुद्द नरेंद्र मोदी यांच्याकडूनच ही घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर खूप लोक एकत्र येणाऱ्या कार्यक्रमांवर तात्पुरते काही निर्बंध घालावेत का, यासाठीही त्यांनी तज्ज्ञांकडून मत मागविले आहे.

अधीर रंजन चौधरींच्या सुरक्षेत वाढ; अज्ञातांनी घरात केली होती तोडफोड

पुढच्या आठवड्यात मंगळवारी देशात सर्व ठिकाणी होळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येईल. होळी हा रंगाचा उत्सव आहे. यानिमित्त अनेक जण एकत्र येत असतात. पण यावेळी नरेंद्र मोदी होळीनिमित्त आयोजित केलेल्या कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. 

या संदर्भात नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक लोक एकत्र येणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी न होण्याचा सल्ला जगातील तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे मी यावेळी कोणत्याही होळी मिलन कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. 

WhatsApp वर आला ‘डार्क मोड’, असा करायचा वापर

कोरोना हा संसर्गजन्य आजार असून, गेल्या काही दिवसांपासून जगातील विविध देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होते आहे. चीनमध्ये कोरोनाचा सर्वात आधी उद्रेक झाला. चीनमध्ये ३००० हून अधिक जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. एकूण ६० पेक्षा अधिक देशांमध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण आहेत.