पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मन की बात': पंतप्रधान मोदींनी दिला जल संरक्षणाचा संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी

प्रचंड बहुमताने पुन्हा सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मन की बात'चा पहिला कार्यक्रम आज (रविवार) झाला. मन की बातमध्ये मोदींनी आणीबाणी, जल संरक्षण, लोकसभा निवडणूक आणि योग दिवसाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.

काय म्हटलंय मोदींनी 'मन की बात'मध्ये..

कितने अच्छे है मोदी!, ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचे ट्विट चर्चेत


गेल्या काही दिवसांमध्ये मन की बात कार्यक्रम झाला नसल्याने मला प्रत्येक रविवारी काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते. जेव्हा मी ‘मन की बात’ करतो. तेव्हा मी जरी बोलत असलो, शब्द माझे असतील, आवाज माझा असेल, पण कथा तुमची आहे, पुरुषार्थ तुमचा आहे, पराक्रम तुमचा आहे.

मन की बातमध्ये पत्र, संदेश खूप येतात. पण यात तक्रारी खूप कमी असतात. देशातील कोट्यवधी लोकांच्या भावना किती उच्च आहे याचा यावरुन अंदाज मांडता येऊ शकतो. देशाच्या पंतप्रधानाला पत्र लिहिल्यानंतरही लोक स्वतःसाठी काहीच मागत नाहीत. 

निवडणुकीपूर्वी जेव्हा मी निवडणुकीनंतर मन की बातमध्ये पुन्हा भेटू असे म्हटले होते. त्यावेळी लोकांनी मोदींना किती आत्मविश्वास आहे असा सवाल केला होता. हा विश्वास माझा नव्हे तर तुमचा होता. मी पुन्हा आलेलो नाही, तर तुम्हीच मला परत आणले आहे.

दहशतवाद हाच सर्वात मोठा धोका - मोदी

जेव्हा भारतात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्यावेळी त्याला फक्त राजकीय वर्तुळातूनच विरोध झाला नव्हता तर प्रत्येक नागरिकांमधून असंतोष उसळला होता.

पाण्याचे महत्व सांगताना ते म्हणाले की, पाणी हे पारसाचे रुप आहे. पाण्याचा एक एक थेंब वाचवण्यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. चित्रपट जगत, माध्यमे, कथा-किर्तन करणाऱ्यांनी आपापल्या परिने पाणी वाचवण्यासाठी मोहीम सुरु केली पाहिजे. त्यांनी पाणी वाचवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी देशातील वेगवेगळ्या भागात जलसंरक्षणासाठी केले जात असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर जपानचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणाले...

जलसंरक्षणासाठी लोकांनी #JanShakti4JalShakti हॅशटॅगचा उपयोग करत आपला कॉन्टेंट अपलोड करण्याचे आवाहन त्यांनी केले.