पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदींच्या मंत्रिमंडळात महिला मंत्र्यांना महत्वाची जबाबदारी

मोदी सरकारमध्ये महिला मंत्र्यांकडे महत्त्वाची जबाबदारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मंत्रिमंडळाचा गुरुवारी शपथविधी झाला. त्यानंतर कोणाला कोणत्या खात्याची जबाबदारी दिली जाणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. त्यावरील पडदाही शुक्रवारी उघडण्यात आला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कालावधीत महिला मंत्र्यांना महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळातील सर्वांत महत्वाचे खाते असलेले अर्थ मंत्रालयाचा कारभार निर्मला सीतारामण यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तर स्मृती इराणी यांच्याकडे महिला व बालविकास आणि वस्त्रोद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

खातेवाटप जाहीर: अमित शहा देशाचे गृहमंत्री, निर्मला सीतारामन यांच्याकडे अर्थखाते

मोदींच्या मंत्रिमंडळात एकूण ६ महिलांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये तिघांना मोठे मंत्रालय तर इतर तिघांना राज्यमंत्री केले आहे. 

पंतप्रधान यांच्या मंत्रिमंडळातील महिला मंत्री

१ निर्मला सीतारामण - अर्थ मंत्री 
२ स्मृती इराणी - महिला आणि बाल विकास 
३ हरसिमरत कौर - अन्न प्रक्रिया

कष्टाचे फळ!, नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात अमित शहा

राज्यमंत्री
१ साध्वी निरंजन ज्योती
२ रेणुका सिंह
३ देबाश्री चौधरी