पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अटल भूजल योजनेचा शुभारंभ! PM मोदी म्हणाले,...

नरेंद्र मोदी

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अटल भूजल योजनेचं उद्घाटन केलं. शेतकरी, तरुणांनानी 'पाणी वाचवा' मोहिम हाती घ्यावी असं सांगत त्यांनी यावेळी त्यांनी पाणी बचत करा, असे आवाहन केले आहे. दिल्लीच्या विज्ञान भवनात हा कार्यक्रम पार पडला.  

'राहुल गांधी- प्रियांका हे पेट्रोल बॉम्ब'

यावेळी मोदी म्हणाले की, या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्याचा उद्देश पूर्ण केला जाईल. ज्या भागांतील पाणीपातळीत प्रचंड मोठ्या प्रमाणात घट होत आहे अशा भागांकडे विशेष लक्ष दिले जाणार असल्याचेही मोदींनी म्हटले आहे. 

मुंबई-पुणे महामार्गावर शालेय बसचा अपघात, १५ विद्यार्थी जखमी

यावेळी मोदी यांनी आणखी एक मोठी घोषणा केली.  हिमाचल प्रदेशला लेह-लडाखशी जोडणाऱ्या रोहतांग बोगद्याला 'अटल बोगदा' असं नाव देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. हा बोगदा सुरक्षेसह पर्यटनाच्या दृष्टीनं महत्वाचा असून अटलबिहारी वाजपेयींच्या स्वप्नांना त्यांच्या नावाशी जोडण्याचं भाग्य मला लाभेल याचा मी कधीच विचार केला नव्हता, असेगी मोदी म्हणाले.