पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जाणून घ्या कलम ३७० बाबत यूएईत पंतप्रधान मोदी काय म्हणाले..

पंतप्रधान मोदी यूएईत दाखल, सर्वोच्च नागरी पुरस्काराने होणार सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दहशतवाद आणि कलम ३७० बाबत मत नोंदवले आहे. भारत चार दशकांपासून सीमेपलिकडून सुरु असलेल्या दहशतवादाची शिकार ठरला आहे. भारत आणि यूएई मानवताविरोधातील शक्तीविरुद्ध काम करत आहे. जे दहशतवाद्यांना आसरा देत आहेत. त्यांना विनाशकारी नीती सोडावी लागेल, असे ते म्हणाले. 

पंतप्रधान मोदी यूएईत दाखल, सर्वोच्च नागरी पुरस्काराने होणार गौरव

जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० हटवण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, आमचे अंतर्गत निर्णय संपूर्णपणे लोकशाही मूल्य पाळणारे आणि पारदर्शक आहेत. जम्मू-काश्मीर काही स्वार्थी गोष्टींमुळे विकसित होऊ शकलेले नाही. या विभक्तीमुळे जम्मू-काश्मीरमधील काही युवकांची दिशाभूल केली गेली. कट्टरपंथी, हिंसा आणि दहशतवादाला परवानगी देण्यात आली. आम्ही अशा प्रवृत्तींना आपल्या सामंजस्यपूर्ण समाजात थारा देऊ शकत नाही. आम्हाला संपूर्ण देशाचा विकास आणि विकासाच्या प्राथमिक कार्यांना रोखू शकत नाही. यूएई आणि त्यांच्या नेतृत्वाने आमच्या निर्णयांचे कौतूक केले आहे. 

'आम्हाला चीनची गरज नाही', डोनाल्ड ट्रम्प भडकले
 
मंदीच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर मोदी म्हणाले की, आम्ही भारतीय अर्थव्यवस्था पुढील पाच वर्षांत ५ ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. यूएई आपल्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करत आहे. आपल्या ताकदीचा वापर करत पारंपारिक क्षेत्राच्या पलीकडे जात आहे. त्याचबरोबर आमच्याकडे समृद्धी प्राप्त करण्यासाठी दृष्टी आणि रोडमॅपसह आकार, गती आणि साधने आहेत. आमची अर्थव्यवस्था वाढता ताळमेळ आणि यूएईमधील लाखो भारतीयांच्या उपस्थितीचा उपयोग करत एकमेकांना पूरक ठरु शकतो.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:PM Modi in UAE Said- Article 370 is concerned our internal steps were taken in a completely democratic and constitutional manner