'ॐ' आणि 'गाय' हे शब्द ऐकल्यानंतर काही लोकांच्या अंगावरील केस उभे राहतात, त्यांना कापरे भरते, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पं. दीनदयाल वृहद पशु आरोग्य मेळाव्याच्या शुभारंभ प्रसंगी मथुरेत ते बोलत होते.
वाहतूक नियम; दंड आकारणी सरकारची महसूल उत्पन्न स्किम
अमेरिकेतील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत मोदींनी यावेळी दहशतवाद्याच्या मुद्यावरही भाष्य केले. दहशतवाद ही एक विचारसरणी बनली असून ही जागतिक समस्या आहे. शेजारील देशात दहशतवादाला पोसले जाते, असे म्हणत त्यांनी नाव न घेता पाकिस्तानला टोला लगावला. दहशतवादाला थारा देणाऱ्यांची गय केली जाणार नाही. भारताने यापूर्वी देखील हे करुन दाखवले आहे, असे मोदी म्हणाले.
मागण्या मान्य न झाल्यामुळे उदयनराजे यांचा भाजप प्रवेश
आजपासून स्वच्छता हिच सेवा अभियान सुरु झाले असून प्लास्टिकमुक्त भारत हा संकल्प प्रत्येकाने डोळ्यासमोर ठेवावा, असे आवाहनही मोदींनी यावेळी केले. २ ऑक्टोंबरला महात्मा गांधी यांचे हे १५०वे प्रेरणावर्ष आहे. आज पासून सुरू होत असलेले हे अभियान विशेषत: प्लास्टिक कचऱ्यापासून मुक्तीला समर्पित करण्यात येत आहे, असे मोदींनी सांगितले.