पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आईचे आशीर्वाद घेण्यासाठी नरेंद्र मोदी उद्या गुजरातला जाणार

संग्रहित छायाचित्र

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए बहुमताने सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी संध्याकाळी आईचे आशीर्वाद घेण्यासाठी गुजरातला जाणार आहेत. त्याचबरोबर मतदारांनी बहुमताने निवडून दिल्यानंतर त्यांचे आभार मानण्यासाठी ते सोमवारी ते वाराणसीत असतील.  लोकसभा निवडणुकीत त्यांनी वाराणसी मतदारसंघातून ४.७९ लाख मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली.

उद्या माझ्या आईचे आशीर्वाद घेण्यासाठी गुजरातला जाईन, असे नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले, परवा दिवशी वाराणसीमध्ये असेन. तेथील लोकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याबद्दल आभार मानण्यासाठी तिथे जाणार आहे, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.