पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

SCO परिषदः पंतप्रधान मोदी-इमरान खान यांची भेट-सूत्र

एससीओ शिखर परिषदेदरम्यानचे छायाचित्र (ANI Photo)

किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची भेट झाल्याचे वृत्त आहे. 'एएनआय'ने सूत्रांच्या हवाल्याने या दोन्ही नेत्यांची काही क्षण भेट झाल्याचे वृत्त दिले आहे. पंतप्रधान मोदी आणि इमरान खान यांची भेट एससीओ शिखर परिषदेतील एका कार्यक्रमादरम्यान झाल्याचे सांगण्यात येते. परंतु, अद्याप भारताकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

दहशतवादाला मदत, अर्थसहाय्य करणाऱ्या देशांना जबाबदार धरा - मोदी 

दरम्यान, इमरान खान यांनी अनेकवेळा पंतप्रधान मोदींशी चर्चेचे अपील केले आहे. तर दुसरीकडे भारताने जोपर्यंत पाकिस्तानकडून दहशतवादाविरोधात कठोर कारवाई केली जात नाही. तोपर्यंत कुठलीही चर्चा शक्य नसल्याचे म्हटले आहे.

VIDEO : इम्रान खान यांच्याकडून पुन्हा एकदा शिष्टाचाराचा भंग

तत्पूर्वी, दहशतवादाला मदत आणि अर्थसहाय्य करणाऱ्या देशांना त्यासाठी जबाबदार धरले जावे, अशी भूमिका पंतप्रधान मोदी यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या SCO व्यासपीठावरून मांडली होती.

शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी मोदींनी चीनचे राष्ट्रपतींची भेट घेतली होती. या दोन्ही नेत्यांमध्ये भारत-चीन संबंध सुधारणेबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. याशिवाय मोदींनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्यासोबतही चर्चा केली. यावेळी त्यांनी अमेठीमधील रायफल युनिटसंदर्भात पुतीन यांचे आभार मानले होते.

PM मोदींनी घेतली चीनच्या राष्ट्रपतींची भेट