पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PM मोदींनी घेतली चीनच्या राष्ट्रपतींची भेट

पंतप्रधानांनी घेतली चीनच्या राष्ट्रपतींची भेट

किरगिझस्तानची राजधानी असलेल्या बिश्केक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेतली. शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेसाठीच्या बैठकीवेळी झालेल्या भेटीत भारत-चीन यांच्यात द्विपक्षीय संबंधावर चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीनंतर मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिली भेट होती. 

द्विपक्षीय बैठकीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि चीनमधील आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टिने सहकार्य करण्यावर भर देण्यात आला. चीनच्या राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर मोदींनी ट्विटच्या माध्यमातून माहिती दिली आहे. या भेटीत चीनच्या राष्टपतींनी मोदींनी लोकसभेत मिळवलेल्या विजयाबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या.  या शुभेच्छा स्वीकारत मोदींनी त्यांना भारतवासियांच्यावतीने वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या. १५ जून रोजी चीनच्या राष्ट्रपतींचा वाढदिवस आहे. मागील पाच वर्षात दोन्ही नेत्यांमध्ये दहापेक्षा अधिक वेळा भेटी झाल्या आहेत. 

भारत स्वतःचं अंतराळ स्थानक उभारणारः इस्रो प्रमुख

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे देखील या परिषदेत सहभागी झाले आहेत. मात्र चीनच्या राष्ट्रपतींची आवर्जून भेट घेणाऱ्या मोदींनी त्यांची भेट घेणे टाळले आहे. मोदींनी चीनच्या राष्ट्रपतींची भेटीची जेवढी चर्चा सुरु आहे अगदी तेवढीच चर्चा त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांची भेट टाळल्याची  सुद्धा चांगलीच चर्चा सुरु आहे.     

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्रीही म्हणतात, मोदी है तो मुमकीन है!

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:pm modi holds extremely fruitful meeting with xi jinping on sidelines of sco summit but avoid pak pm