पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'अर्थव्यवस्थेचे पुढे काय करायचे याबद्दल मोदी सरकार अनभिज्ञ'

राहुल गांधी

देशाच्या अर्थव्यवस्थेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टीका केली. मंदीच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेचे पुढे काय करायचे, याबद्दल मोदी सरकार पूर्णपणे अनभिज्ञ असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर ट्विटच्या माध्यमातून त्यांनी ही टीका केली.

निर्भया प्रकरण : मुकेश सिंहची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

येत्या शनिवारी पुढील आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प लोकसभेत मांडण्यात येणार आहे. निर्मला सीतारामन अर्थसंकल्प मांडतील. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आर्थिक सल्लागारांनी अर्थव्यवस्था उलट्या दिशेने नेली आहे. पूर्वी विकासदर ७.५ टक्के होता आणि चलनवाढीचा दर ३.५ टक्के. आता विकासदर ३.५ टक्क्यांवर आला आहे आणि चलनवाढीचा दर ७.५ टक्क्यांवर पोहोचला आहे. पंतप्रधान आणि अर्थमंत्री या दोघांनाही आता पुढे काय करायचे याची काहीही माहिती नाही. ते दोघेही याबाबत अनभिज्ञ आहेत, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर सौरव गांगुलीने केले भाष्य

देशातील आर्थिक मंदीमुळे चिंतेचे वातावरण आहे. बेरोजगारी कमी होत नसताना आता महागाईचे निर्देशांकही चढत्या क्रमावर असल्यामुळे परिस्थिती चिंताजनक झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अर्थसंकल्पात मंदी दूर करून विकासदर पुन्हा वाढण्यासाठी काय उपाययोजना करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.