पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

PM मोदींची अयोध्यासंदर्भात पहिल्यांदाच 'मन की बात'

नरेंद्र मोदी

राम जन्म भूमीच्या निकालापूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालाची आठवण करुन देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच अयोध्या प्रकरणावर भाष्य केले. अयोध्येप्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी मोदींनी देशवासियांना संयम बाळगण्याचे आवाहन केले. 

आमचं काय चुकलं? : चंद्रकांत पाटील

'मन की बात' या कार्यक्रमात मोदी म्हणाले की, सप्टेंबर २०१० मध्ये जेव्हा अलाहबाद उच्च न्यायालयाने अयोध्येप्रकरणी ऐतिहासिक निकाल दिला. त्यावेळी कसे वातावरण होते ते आठवा. अनेक समूह आपापल्या फायद्याचा विचार करत होते.  वातावरण तापवण्यासाठी अनेक विधाने केली गेली. काहींनी प्रकाशझोतात येण्याच्या उद्देशाने काही वक्तव्ये केल्याचा आरोप मोदींनी यावेळी केला. 

सोनं विक्रीच्या वृत्तावर आरबीआयचे स्पष्टीकरण

परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर देशात आनंदमय वातावरण आहे. सरकार, राजकिय पक्ष, सामाजिक संघटना आणि सामान्य नागरिक सर्वच स्तरावर संतुलित प्रतिक्रिया आल्या. अंतिम निकालांनंतरही असाच संयम बाळगायला हवा, असा सल्ला मोदींनी देशवासियांना दिला.