पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... म्हणून नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यांवेळी काही तासांसाठी हॉटेलमध्ये उतरणे टाळतात

नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर असताना कशा पद्धतीने सरकारी पैशाची बचत करतात, याचे उदाहरणच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी लोकसभेत एका चर्चेतील उत्तरात दिले. नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर जाताना ज्यावेळी टेक्निकल स्टॉप घ्यावा लागतो. म्हणजे विमानात इंधन भरण्यासाठी ते प्रवासात मधे एखाद्या विमानतळावर उतरविले जाते. त्यावेळी नरेंद्र मोदी कोणत्याही पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरत नाहीत. ते संबंधित विमानतळावरील लॉऊंजमध्येच थांबतात. गरज पडल्यास विमानतळावरच स्नान वगैरे करतात, असे अमित शहा यानी सांगितले. वैयक्तिक खर्चात काटकसर करण्यासाठीच त्यांच्याकडून हे सर्व केले जाते, याकडे त्यांनी लोकसभेचे लक्ष वेधले.

संजय राऊत यांचे पुन्हा एक नवे ट्विट, शिवसैनिकांचा उत्साह शिगेला

सहसा कोणतेही पंतप्रधान परदेश दौऱ्यावर जाताना जर त्यांना एखाद्या विमानतळावर टेक्निकल स्टॉप घ्यावा लागला. तर पंतप्रधान आणि त्यांच्यासोबतच्या शिष्टमंडळासाठी विमानतळाजवळील पंचतारांकित हॉटेल आरक्षित केले जाते. काही तासांसाठी हे हॉटेल आरक्षित केलेले असते. पण त्याचा खर्च जास्त असतो. तो टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अशावेळी हॉटेलमध्ये उतरतच नाहीत. ते विमानतळावरच थांबतात, असे अमित शहा म्हणाले. 

अमित शहा म्हणाले, आपल्या वैयक्तिक आयुष्यात नरेंद्र मोदी अत्यंत शिस्तबद्ध आणि काटेकोर आयुष्य जगतात. ते जेव्हा परदेश दौऱ्यावर जातात. तेव्हा २० टक्क्यांपेक्षा कमी कर्मचारी सोबत घेऊन जातात. आधी अशा दौऱ्यांमध्ये प्रत्येक व्यक्ती वेगवेगळी कार वापरत असे. पण आता नरेंद्र मोदींनी त्याला विरोध केला. तीन ते चार सदस्यांनी मिळून एकच कार वापरावी, असे निर्देश त्यांनी दिले आणि त्या पद्धतीचे पालन आजही केले जाते. आता तर काही ठिकाणी बसचा वापर करण्यालाही प्राधान्य दिले जाते.

'नव्या सरकारसाठी सोनियाजींचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन हवे'

संसदेमध्ये एसपीजी सुरक्षा सुधारणा विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना अमित शहा यांनी नरेंद्र मोदींचे कौतुक केले. नरेंद्र मोदी एसपीजी सुरक्षेचे सर्व संकेत आणि शिष्टाचार कायम पाळतात, असेही त्यांनी सांगितले.