पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्वातंत्र्य दिनाच्या भाषणासाठी मोदींनी मागवली जनतेची मतं

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरुन स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण करणार आहेत. त्यांच्या दुसऱ्या टर्ममधील लाल किल्ल्यावरुन पहिले भाषण ठरेल. त्यांच्या भाषणाकडे संपूर्ण देशाबरोबर जगाचेही लक्ष आहे. पंतप्रधान मोदी यांनी यासाठी देशातील जनतेची मतं मागवली आहेत. 

जाधव यांना न्याय मिळेल, ICJ च्या निकालानंतर मोदींची प्रतिक्रिया

पंतप्रधान मोदी यांनी टि्वट करत म्हटले आहे की, तुमचे विचार लाल किल्ल्यावरुन देशातील १३० कोटी भारतीय ऐकतील. 'नमो अॅप'वर तुमची मते नोंदवा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

यामध्ये पंतप्रधान मोदींनी नागरिकांना आपले मत मांडण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या भाषणात यातील काही सूचनांची दखल घेतली जाऊ शकते.