पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊनच्या अंमलबजावणीची जबाबदारी नरेंद्र मोदींनी सोपविली यांच्यावर...

घरातील लहान मुलांनी वडिलधाऱ्या मंडळींना घराबाहेर जाऊन देऊ नये, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री देशवासियांना उद्देशून केलेल्या भाषणामध्ये बुधवारपासून देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी पुढील २१ दिवस हे लॉकडाऊन असणार आहे. आता नरेंद्र मोदींनी या लॉकडाऊनची घराघरांत व्यवस्थित अंमलबजावणी करण्याची जबाबदारी बालसेनेवर सोपविली आहे. घरातील लहान मुलांनी वडिलधाऱ्या मंडळींना घराबाहेर जाऊन देऊ नये, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

लॉकडाऊनच्या निर्णयाचे सोनिया गांधींकडून स्वागत, काही सूचनाही केल्या

नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडिओ ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, माझा आमच्या बाल सेनेवर पूर्ण विश्वास आहे. लोक आपल्या घरातच राहतील, ही जबाबदारी ते नक्कीच पार पाडतील. त्यामुळे भारत कोरोना विषाणूविरोधात लढा देऊ शकेल. 

लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला धक्का, जीडीपी २.५ टक्के राहण्याची शक्यता

याच ट्विटसोबत त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये घरातील लहान मुलगी तिच्या बाबांना घरातून बाहेर जाऊ देत नाही. कोरोना विषाणूशी लढण्यासठी ती त्यांना घरातच थांबण्यास सांगते. हा व्हिडिओ त्यांनी शेअर केल्यानंतर त्याला ७४००० लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर १५००० पेक्षा जास्त युजर्सनी हे ट्विट रिट्विट केले आहे.