पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राष्ट्रवादीकडून थोडं शिका, मोदींनी राज्यसभेत केलं कौतुक

शरद पवार आणि नरेंद्र मोदी (संग्रहित छायाचित्र)

भारतीय संसदेचे वरिष्ठ  सभागृह असलेल्या राज्यसभेतील २५० व्या सत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विद्यमान सदस्यांना संबोधित केले. राज्यसभेचा आतापर्यंतचा प्रवास हा प्रेरणादायी असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. राज्यसभेतील आतापर्यंतच्या प्रवासातील अनेक गोष्टींवर त्यांनी भाष्य केले. यात त्यांनी राष्ट्रवादी आणि बीजेडी पक्षाचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले. 

लोक येतील अन् जातील, पण ही व्यवस्था चालतच राहील : मोदी

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बीजू जनता दल (बीजेडी) या पक्षांकडून संसदीय कामकाजात कसे सहभागी होतात हे शिकण्यासारखे आहे, असे मोदींनी म्हटले. हे दोन्ही पक्ष संसदेत आपली भूमिका प्रभावीपणे मांडतात. आपला मुद्दा पटवून देण्यासाठी आक्रमकपणा दाखवत या पक्षातील सदस्य वेलमध्ये (सभापतींच्या समोरील मोकळी जागा) कधीच येत नाहीत. त्यांची ही गोष्ट माझ्यासह इतर पक्षांनी शिकायला हवी, असा सल्लाही मोदींनी यावेळी दिला.  

उदयनराजेंना पराभूत करणारे श्रीनिवास पाटील यांनी घेतली शपथ

राज्यसभा हे दुसरे सभागृह आहे पण ते दुय्यम नाही या माजी पंतप्रधान अटलजींच्या विधानाचा दाखला देत देशाच्या विकासात राज्यसभा महत्त्वाची भूमिका बजावते, असेही मोदी यावेळी म्हणाले. कलम ३७० संदर्भातील राज्यसभेत झालेला निर्णय माझ्यासाठी खास असाच होता, असा उल्लेखही मोदींनी यावेळी केला.