पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अयोध्येतील राम मंदिरासाठी ट्रस्ट निर्मितीची पंतप्रधानांकडून लोकसभेत घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत बोलताना

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी राम मंदिर ट्रस्टच्या स्थापनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच याची माहिती लोकसभेत दिली. अयोध्येतील या ट्रस्टचे नाव श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र असे असेल. या ट्रस्टअंतर्गत अयोध्येतील अधिग्रहित ६७.७० एकर जागेचा विकास करण्यात येईल, असे नरेंद्र मोदींनी सांगितले.

महाराष्ट्रात सिंगल युज प्लॅस्टिकवर एक मेपासून बंदी

लोकसभेत या संदर्भात निवेदन करताना नरेंद्र मोदी म्हणाले, भारतात हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बौद्ध, पारशी आणि जैन हे सर्व जण एकाच कुटूंबातील आहेत. या कुटूंबातील प्रत्येकासाठी विकास झालाच पाहिजे. सबका साथ, सबका विकास हेच धोरण घेऊन आमचे सरकार पुढे निघाले आहे. कुटूंबातील प्रत्येकाच्या आनंदासाठी आम्ही काम करतो आहोत. 

कर्नाटकात शाळेविरोधात देशद्रोहाचा गुन्हा, नाटकात पंतप्रधानांचा अवमान

रामजन्मभूमी प्रकरणात निकाल आल्यानंतर देशातील नागरिकांनी लोकशाही व्यवस्थेबद्दल नितांत आदर व्यक्त केला. देशातील १३० कोटी नागरिकांना मी सलाम करतो, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. अयोध्येतील रामजन्मभूमी परिसराचा विकास करण्यासाठी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट स्थापन करण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत या ठिकाणी सरकारकडून अधिग्रहित ६७ एकर जागेचा विकास करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.