पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अभूतपूर्व यशानंतर PM मोदींनी घेतला आईचा आशीर्वाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवास्थानी जाऊन त्यांच्या आईचा आशीर्वाद घेतला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील आपल्या निवास्थानी जाऊन त्यांच्या आई हिराबेन यांचा आशीर्वाद घेतला. लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशानंतर मोदी आज (रविवारी) गुजरातमध्ये दाखल झाले आहेत. आपल्या निवस्थानी जाण्यापूर्वी मोदींनी भाजपच्या खानापूर परिसरातील कार्यालयाला भेट दिली.याठिकाणी त्यांनी जनतेचे आभार मानले. जनतेला संबोधित केल्यानंतर मोदी आपल्या गांधीनगर येथील निवास्थानी पोहचले. 

मोदींनी काल (शनिवारी) ट्विटच्या माध्यमातून शपथविधीपूर्वीच्या आपल्या दौऱ्याची माहिती दिली होती. रविवारी गुजरातला जाणार असून संध्याकाठी आईचा आशीर्वाद घेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानंतर काशीला जाणार असल्याचा उल्लेखही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला होता.  

 

मोदी आपल्या निवासस्थानी येणार असल्याची जनतेला पूर्वीच कल्पना असल्यामुळे अनेक नागरिकांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी केली होती. आपली पहिली टर्म यशस्वीपणे पार पाडल्यानंतर आता मोदी दुसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. ३० मे रोजी राष्ट्रपती भवनामध्ये मोदींचा शपथविधी समारोह पार पडणार आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:PM Minister Narendra Modi meets his mother Heeraben Modi at her residence in Gandhinagar and seeks her blessings