पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊन कसा संपवायचा, पंतप्रधानांनी मागविल्या मुख्यमंत्र्यांकडून शिफारशी

सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला

२१ दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर सामान्य जनजीवन सुरळीतपणे सुरू करण्यासाठी पुढे काय करायचे याचे धोरण सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्रितपणे निश्चित करावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी स्पष्ट केले. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. लॉकडाऊन कशा पद्धतीने संपुष्टात आणायचा याबद्दल सर्व मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या शिफारशी पाठवाव्यात, अशीही सूचना यावेळी त्यांनी केली. 

पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याला कोरोना; सोबतचे २३ जण क्वारंटाईन

सोशल डिस्टन्सिंगच्या मुद्द्यावर नरेंद्र मोदी यांनी या चर्चेमध्ये सर्वाधिक भर दिला. कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यात काही प्रमाणात भारताने यश मिळवले आहे, असेही त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांमध्ये दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या आधी २० मार्चला त्यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. 

संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू केल्याबद्दल सर्व मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले. या विषाणूमुळे कमीत कमी लोकांना आपले प्राण गमवावे लागावेत, यासाठीच लॉकडाऊनचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. येत्या काही दिवसांमध्ये टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रॅकिंग, आयसोलेशन आणि क्वारंटाईन याच सर्व मुद्द्यांवर सर्वांनी भर दिला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

तिरस्काराचा व्हायरस पसरवू नका, भज्जीने नेटकऱ्यांना लगावली चपराक

देशात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहिला पाहिजे. त्याचबरोबर औषधे आणि वैद्यकीय उपकरणे यासाठी लागणार कच्चा मालही उपलब्ध झाला पाहिजे, यावर लक्ष देण्याची सूचना त्यांनी सर्व राज्यांना केली.