कोरोना विषाणू विरोधातील संकटाला थोपवण्यासाठी मोदी सरकारकडून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहेत. लॉकडाऊनचा निर्णय घेऊन सरकार कठोर पावले उचलण्यात मागे पुढे पाहणार नाही, हे मोदींनी दाखवून दिले आहे. यानंतर आता मोदी सरकारच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांना राज्यनुसार स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली आहे.
मोठा निर्णय: राज्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकानं २४ तास सुरु राहणार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रकाश जावडेकर यांच्याकडे महाराष्ट्र राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. प्रत्येक दिवशी कोरोना विषाणूसंदर्भातील आढावा घेणे आणि त्याची माहिती केंद्राला देण्याची प्रमुख जबाबदारी असेल.
कोरोनाशी लढा : राष्ट्रवादीचे आमदार-खासदार एक महिन्याचे वेतन देणार
याशिवाय भाजपकडून कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लॉकडऊनच्या दरम्यान रोजंदारीवर काम करणाऱ्या आणि उपासमारीची वेळ आलेल्या लोकांसाठी विषेश अभियान सुरु करण्यात येणार आहे. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देशभरातील गरिब आणि मजदूर वर्गातील लोकांना भोजन देण्यासाठी आढावा घेतला आहे. लॉकडाऊनच्या काळात कोणाचीही उपासमार होऊ नये, याच्यासाठी भाजप ही मोहिम राबवणार आहे.