पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

व्हा सावध!, पीएम केअर्स फंडच्या नावाने बनावट वेबसाइट्स सक्रिय

कोरोना विषाणूशी निपटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला निधी देण्याचे आवाहन केले हो

कोरोना विषाणूशी निपटण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला निधी देण्याचे आवाहन केले होते. यासाठी प्राईम मिनिस्टर सिटीझन असिस्टन्स अँड रिलिफ इन इमर्जन्सी सिच्यूएशन फंड (पीएम केअर्स फंड) सुरु केला आहे. त्यानंतर देशभरातून या खात्यात मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे. परंतु, काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या संधीचा फायदा उठवताना दिसत आहेत. पंतप्रधान केअर्स फंडच्या नावावर दोन बनावट वेबसाइट्स आढळून आल्या आहेत. यावरुन सरकारने नागरिकांना सावधनतेचा इशारा जारी केला आहे

धन्य निर्णय! कोरोनाशी लढण्यासाठी डॉक्टरांना दिले रेनकोट, सनग्लासेस

अशी ओळखा बनावट वेबसाइट

दिल्ली पोलिस आयुक्त एस एन श्रीवास्तव यांनी सांगितले की, पंतप्रधान मदत निधीसाठी जो यूपीआय आयडी आहे तो PMCARES@SBI (पीएमकेअर्स@एसबीआय) असा आहे. तर बनावट अकाऊंट हे PMCARE@SBI म्हणजेच पीएमकेअर@एसबीआय असे आहे. दोन्ही आयडीमध्ये फक्त 'एस'चा फरक आहे. त्याचबरोबर आणखी एका यूपीआयची तक्रार आली आहे. जी PMCAREE@SBI नावाने आहे. स्टेट बँकेने निवेदन प्रसिद्ध केले असून त्यांचे पथक याचा शोध घेत असल्याचे सांगितले आहे. 

कोरोनामुळे संपूर्ण जगात मंदीची शक्यता, भारतासाठी मात्र खूशखबर

सावधानता बाळगा

सरकारच्या वतीने पीआयबीने टि्वट करुन सांगितले की, पंतप्रधान केअर्स फंडमध्ये निधी देण्यासाठी हा pmcares@sbi यूपीआय आयडी आहे. याशिवाय जर तुमच्याकडे कोणतीही लिंक अथवा संदेश आला. ज्याच्यामध्ये आयडी नसेल तर तिथे निधी जमा करु नका. पंतप्रधान निधीच्या नावावर आपली फसवणूक होऊ शकते.

'वृत्तपत्र, दुधाच्या पिशवीला हात लावल्याने कोरोना होत नाही'

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:PM CARES fund Beware of fake website after Prime minister modi announces relief fund covid 19 Coronavirus