पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जीडीपीवर सुब्रमण्यम यांच्या दाव्याला सरकार देणार उत्तर

अरविंद सुब्रमण्यम  (HT photo)

जीडीपीची आकडेवारी वाढवून सादर केल्याचा माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांचा दावा पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने फेटाळला आहे. वेळ आल्यानंतर प्रत्येक आरोपांचे व्यवस्थितीत खंडन करण्यात येईल, असे समितीने म्हटले आहे. 

विकास आणि रोजगार वृद्धीसाठी पंतप्रधानांकडून दोन नवे मंत्रिगट

अरविंद सुब्रमण्यम यांनी आपल्या ताज्या संशोधन अहवालात दावा केला की, आर्थिक वर्ष २०११-१२ ते २०१६-१७ दरम्यान भारताच्या जीडीपी वाढीचा दर कदाचित २.५ टक्क्यांनी वाढवून सांगण्यात आला होता. आर्थिक वर्ष २०११ आणि २०१६ दरम्यान जीडीपीमध्ये ६.९ टक्के वृद्धीचा दावा करण्यात आला होता. पण यादरम्यान वाढीचा दर हा ३.५ ते ५.५ टक्के असण्याची शक्यता सुब्रमण्यम यांनी वर्तवली आहे. 

देशातील बँकांमध्ये एका वर्षात ७१ हजार कोटींचे घोटाळे

समितीने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सुब्रमण्यम यांच्या अहवालात करण्यात आलेल्या आकडेवारीचा विस्तृतपणे तपास केला जाईल आणि येणाऱ्या काळात त्याचे खंडन केले जाईल.