आपली मुलगी सनाला राजकीय मुद्द्यांपासून दूर ठेवा, अशी विनंती माजी क्रिकेटपटू आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केली आहे. सुधारित नागरिकत्व कायद्यावरून सनाने एक पोस्ट शेअर केल्याचा स्क्रिन शॉट सध्या सोशल मीडियात फिरतो आहे. तो खरा नसल्याचे सौरव गांगुली यांनी म्हटले आहे. सनाच्या नावाने फिरणाऱ्या या स्क्रिन शॉटमध्ये प्रख्यात लेखक खुशवंत सिंग यांच्या 'द एंड ऑफ इंडिया' या पुस्तकातील एक उतारा आहे. सुधारित नागरिकत्व कायदा लागू करण्याच्या पार्श्वभूमीवर हा उतारा अत्यंत बोधक आहे.
नागरिकत्व कायदा: रामचंद्र गुहा पोलिसांच्या ताब्यात
सनाच्या नावाने फिरणाऱ्या स्क्रिन शॉटनंतर सौरव गांगुली यांनी एक ट्विट प्रसिद्ध केले आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, कृपा करून सनाला या सगळ्यापासून दूर ठेवा... ती पोस्ट खरी नाही. सना तरूण आहे. देशातील राजकारण समजून घ्यायला तिला वेळ लागेल.
भाजपला पर्याय हवाय पण देशात राहणारा, शरद पवारांचा राहुल गांधींना टोला
सुधारित नागरिकत्व कायदा देशात लागू झाला आहे. या कायद्याला स्थगिती देण्यास बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. या कायद्यानुसार पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधून आलेल्या हिंदू, जैन, बौद्ध, शीख, पारशी आणि ख्रिश्चन समाजातील नागरिकांना त्यांनी अर्ज केल्यावर भारतीय नागरिकत्व दिले जाऊ शकते. ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी देशात आलेल्या स्थलांतरितांनाच या कायद्यानुसार नागरिकत्वासाठी अर्ज करता येणार आहे. देशातील सध्याच्या नागरिकांशी या कायद्याचा काही संबंध नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.