पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया बलात्कार प्रकरण : सुप्रीम कोर्टातील उद्याच्या सुनावणीकडे लक्ष

निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी

दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींच्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला दिलेल्या स्थगितीविरोधात केंद्र आणि दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय तातडीने सुनावणी घेण्यास तयार झाले असून, शुक्रवारी यावर सुनावणी घेण्यात येणार आहे. निर्भया बलात्कार प्रकरणातील चारही दोषींना लवकरात लवकर फाशी दिली जावी. त्यासाठी न्यायालयाने डेथ वॉरंट जारी करावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

फास्टॅगच्या माध्यमातून कोट्यवधींची चोरी, चौघांना अटक

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन व्ही रमणा यांच्यापुढे या प्रकरणी सुनावणी झाली. केंद्राचे अतिरिक्त महाधिवक्ता के एम नटराज यांनी सरकारकडून युक्तिवाद करताना या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली. न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. 

केंद्राने या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात केलेली याचिका बुधवारी फेटाळण्यात आली होती. या प्रकरणातील सर्व दोषींना एकाच वेळी फाशी देण्यात यावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. त्यासाठी न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या एका निकालाचा दाखला दिला. 

या प्रकरणातील मुकेश सिंह याची दया याचिका सर्वात आधी राष्ट्रपतींनी फेटाळली होती. पण म्हणून त्याला इतरांच्या आधी फाशी देता येणार नाही. कारण या प्रकरणातील चारही दोषींचा गुन्हा एकसारखाच आहे. त्यांना सुनावण्यात आलेली शिक्षाही एकसारखीच आहे. त्यामुळे त्यांना एकाचवेळी फाशी दिली पाहिजे, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

कोरोनामुळे भारतातील हिरे व्यापारास ८ ते १० हजार कोटींचा फटका

निर्भया बलात्कार प्रकरणातील चार दोषींपैकी दोघांचे आपल्या बचावाचे सर्व पर्याय वापरून संपले आहेत. फेरविचार याचिका, न्यायसुधार याचिका आणि दया याचिका या सर्व फेटाळण्यात आल्या आहेत. तिसऱ्या दोषीची दया याचिका याच आठवड्यात फेटाळण्यात आली आहे. पण या प्रकरणातील चौथा दोषी पवन गुप्ता याने अद्याप सर्वोच्च न्यायालयात न्यायसुधार याचिका दाखल केलेली नाही. त्याचबरोबर त्याने राष्ट्रपतींकडे दया याचिकाही दाखल केलेली नाही.