पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बँकॉकला निघालेल्या विमानात महिलेची प्रसूती, कोलकात्यात इमर्जन्सी लँडिंग

कतार एअरवेज

दोहाहून बँकॉकला निघालेल्या कतार एअरवेजच्या विमानाला मंगळवारी पहाटे कोलकाता विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. या विमानातून प्रवास करणाऱ्या थायलंडमधील एका महिला प्रवाशाची विमानातच प्रसूती झाली. तिने विमानातच बाळाला जन्म दिल्यामुळे वैमानिकाला कोलकाता विमानतळावरील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.

काँग्रेसच्या दिग्गज नेत्याचा मुलाने केला भाजपमध्ये प्रवेश

संबंधित महिला प्रवासी नऊ महिन्यांची गरोदर होती. ती या विमानाने आपल्या मायदेशी निघाली होती. पण विमानातच तिला प्रसूती कळा सुरू झाल्या आणि तिने बाळाला जन्म दिला. हे विमान मंगळवारी पहाटे ३.०७ वाजता कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले.

'महात्मा गांधींबद्दल अवमानकारक बोलणारे रावणाची औलाद'

विमान विमानतळावर उतरल्यानंतर लगेचच संबंधित माता आणि बाळाला लगेचच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर हे विमान मंगळवारी पहाटे ५.५४ वाजता बँकॉकमधील सुवर्णभूमी विमानतळाकडे रवाना झाले.