पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अ‍ॅमेझॉनच्या गुंतवणुकीवरील वक्तव्यावर पीयूष गोयल म्हणाले..

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

अ‍ॅमेझॉन कंपनी भारतात गुंतवणूक करुन उपकार करत नसल्याचे वक्तव्य करुन खळबळ उडवून देणारे केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी आता खुलासा केला आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. त्यांच्या गुंतवणुकीचे स्वागत आहे पण ही गुंतवणूक कायद्यानुसार व्हायला हवी, असे गोयल यांनी स्पष्ट केले आहे. ग्लोबल ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनच्यावतीने भारतात एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे म्हटले होते. 

SBI ने बचतीवर चालवली कात्री, कोट्यवधी ग्राहकांना बसणार झटका

अ‍ॅमेझॉन देशात आयटी, इन्फ्रास्ट्रक्चर आणि लॉजिस्टिक्स नेटवर्कमध्ये गुंतवणुक करणार आहे. या माध्यमातून पुढील पाच वर्षांत म्हणजेच २०२५ पर्यंत देशात १० लाख नवीन नोकऱ्या निर्माण होतील, असा कंपनीचा दावा आहे.

यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगारांचा समावेश आहे. यामध्ये तंत्रज्ञान, कौशल्य विकास, मनोरंजन सामग्री निर्मिती, घाऊक बाजार, लॉजिस्टि्क आणि उत्पादन आदी विविध क्षेत्रात रोजगाराची निर्मिती होईल. 

बजाजची इलेक्ट्रिक चेतक : रिव्हर्स गिअर, घरातच चार्ज करता येणार आणि बरंच काही...

अ‍ॅमेझॉन डॉट कॉमचे प्रमुख जेफ बेझोस म्हणाले की, ते भारतात एक अब्ज डॉलरची (७००० कोटी रुपयांहून अधिक) गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे लघु आणि मध्यम उद्योग ऑनलाइन करण्यास मदत करता येईल आणि कंपनी २०२५ पर्यंत १० अब्ज डॉलर मूल्याचे भारतात उत्पादित साहित्याची निर्यात करण्यास प्रतिबद्ध आहे.

SBIचा अहवाल, यावर्षी १६ लाख नोकऱ्या घटणार