पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'इंडिगो'चे उड्डाणाच्या तयारीतील विमान अचानक थांबविले आणि...

इंडिगोचे विमान

भोपाळमधील राजा भोज विमानतळावरून मुंबईला येण्यासाठी निघालेले इंडिगोचे विमान सोमवारी संध्याकाळी अगदी उड्डाण करण्याच्या स्थितीत असतानाच अचानकपण थांबविण्यात आले. विमानाच्या चाकांमध्ये तांत्रिक दोष असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आल्यामुळे त्याने उड्डाणासाठी विमानाने वेगवान गती घेतली असतानाही उड्डाण केले नाही आणि विमान धावपट्टीवरच ठेवले. उड्डाणासाठी विमानाने वेग घेतलेला असतानाच वैमानिकाने ते थांबविल्याने मोठा आवाज झाला यामुळे प्रवाशांमध्ये काही वेळ भितीचे वातावरण पसरले होते. विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णांचे जावई आणि CCDचे मालक सिद्धार्थ बेपत्ता

सोमवारी संध्याकाळी साडेसहा ते पावणेसातच्या दरम्यान विमानतळावर ही घटना घडली. भोपाळ विमानतळावरील इंडिगोच्या व्यवस्थापिका एकता श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार विमानात एकूण १५५ प्रवासी होते आणि ते सर्व सुखरुपपणे मुंबईला पोहोचले आहेत. विमान नियमित वेळेनुसार भोपाळमधून मुंबईला निघाले होते. धावपट्टीवर दाखल झाल्यावर विमानाने उड्डाणासाठी वेग पकडला. पण त्याचवेळी विमानाच्या चाकांमध्ये दोष असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्याने उड्डाण न करता विमान धावपट्टीवरच थांबविण्याचा निर्णय घेतला. अचानक हा निर्णय घेतल्याने विमानाची गती कमी करण्यात आली. त्यामुळे जोरदार आवाज झाला. या आवाजामुळे विमानातील प्रवाशांना नेमके काय घडले आहे हे समजले नाही. नंतर त्यांना विमानात तांत्रिक दोष असल्यामुळे उड्डाण थांबविण्यात आल्याची माहिती देण्यात आली. 

पाकिस्तानी लष्कराचे विमान कोसळले, १७ जणांचा मृत्यू

विमानाच्या चाकांमधील तांत्रिक दोष दूर केल्यानंतर हेच विमान पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आल्याचे एकता श्रीवास्तव यांनी सांगितले.