पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कर्तारपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी पासपोर्ट आवश्यक

कर्तारपूरमधील गुरुद्वारा

कर्तारपूर कॉरिडॉरच्या माध्यमातून दरबार साहिब गुरुद्वारा येथे जाणाऱ्या भारतीय नागरिकांनी सोबत आपला पासपोर्ट बाळगावा, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गेल्या आठवड्यात कर्तारपूरला जाण्यासाठी भारतीय नागरिकांना पासपोर्ट बाळगण्याची गरज नसल्याचे म्हटले होते. केवळ वैध सरकारी ओळखपत्र असले, तरी पुरेसे आहे, असे त्यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले होते.

फडणवीसांना मुख्यमंत्री करुन दाखवा, राऊतांचे भाजपला चॅलेंज

पाकिस्तानमधील माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानी लष्कराच्या माध्यम विभागाने कर्तारपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी पासपोर्टच्या आधारावर परवाना देण्याचे निश्चित केल्याचे म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रवीशकुमार म्हणाले, पाकिस्तानी माध्यमांमध्ये प्रसृत झालेले वृत्त परस्परविरोधी आहे. काहीवेळा ते म्हणतात पासपोर्टची गरज नाही. काहीवेळा म्हणतात पासपोर्ट आवश्यक आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालय आणि इतर विभाग यांच्यामध्ये संवादाचा अभाव असल्याचे दिसते. याविषयी भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सामंजस्य करारानुसार कर्तारपूरला जाण्यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी पासपोर्ट बाळगावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

... म्हणून शिवसेनेच्या आमदारांना रंगशारदामध्ये ठेवलंय

कर्तारपूरमधील दरबार साहिब गुरुद्वारा हे शीख बांधवांचे श्रद्धास्थान आहे. कर्तारपूरमधील हा गुरुद्वारा आणि पंजाबमधील गुरुदासपूर जिल्ह्यातील डेरा बाबा नानक गुरुद्वारा यांना जोडण्यासाठी कॉरिडॉर (मार्गिका) तयार करण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये यासाठी करारही करण्यात आला आहे.