पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'देशविघातक कृत्यांचा आरोप असलेले PFIचे नेते आप, काँग्रेसच्या संपर्कात'

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलन

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात उत्तर प्रदेशासह इतर राज्यांत झालेल्या हिंसाचारामागे ज्यांचा हात असल्याचा संशय आहे, त्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे मुख्यालय दिल्लीत शाहिन बाग परिसरातच आहे. विविध देशविघातक कृत्ये करण्यासाठी याच संघटनेकडून लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत, अशी माहिती सक्तवसुली संचालनालयाने (ED) या संदर्भात केलेल्या तपासातून पुढे आली आहे. याच विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर ही माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून या संघटनेच्या विविध आर्थिक व्यवहारांची तपासणी सक्तवसुली संचालनालयाकडून सुरू आहे.

'मुख्य प्रश्नांपासून लक्ष वळविण्यासाठी मोदींकडून इतर मुद्द्यांचा वापर'

सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे दिल्ली विभागाचे प्रमुख मोहम्मद परवेझ अहमद हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह आणि काँग्रेस नेते उदीत राज यांच्यासह या दोन्ही पक्षांच्या इतर नेत्यांच्या संपर्कात आहेत.

दिल्ली विधानसभेसाठी येत्या शनिवारी, ८ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. निवडणुकीच्या प्रचाराची आजच सांगता झाली. त्या पार्श्वभूमीवर सक्तवसुली संचालनालयाची माहिती महत्त्वाची मानली जात आहे. 

शीना बोरा प्रकरण : पीटर मुखर्जींनां जामीन मंजूर

मोहम्मद परवेझ हे केवळ सुधारित नागरिकत्व विरोधी आंदोलनांमध्ये सहभागी होत नसून, ते विविध माध्यमांतून संजय सिंह यांच्या संपर्कातही आहेत. वैयक्तिक भेटीगाठी, फोन आणि व्हॉट्सऍप चॅटिंगच्या माध्यमातून हे दोघे एकमेकांच्या संपर्कात आहेत, अशी माहिती पुढे आली असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
मोहम्मद परवेझ हे १०० व्हॉट्सऍप ग्रुप्समध्येही सहभागी आहे. युनिफिकेशन ऑफ मुस्लिम लीडरशीप आणि भीम आर्मी टॉप १०० अशी या ग्रुप्सची नावे आहेत, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.