पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निर्भया प्रकरण : मुकेश सिंहची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

निर्भया बलात्कार प्रकरणातील मुकेश सिंहची याचिका फेटाळण्यात आली.

दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याने राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका बुधवारी फेटाळण्यात आली. मुकेश सिंहसह या प्रकरणातील चारही दोषींना येत्या शनिवारी, एक फेब्रुवारीला फाशी देण्यात येणार आहे. 

सहा वर्षांपूर्वी निधन झालेल्या महाराजांवर अद्याप अंत्यसंस्कार नाही

न्या. आर. बानूमथी यांच्या नेतृत्त्वाखाली तीन सदस्यीय खंडपीठाने मुकेश सिंह याची याचिका फेटाळली. केंद्र सरकारने आवश्यक कागदपत्रे न दिल्यानेच राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळली, असा युक्तिवाद मुकेश सिंह याच्या वकिलांनी केली. पण न्यायालयाने तो फेटाळला. या दाव्यात काहीही तथ्य नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.

या प्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असताना आपल्यावर अत्याचार करण्यात आले. आपल्याला यातना सहन कराव्या लागल्या, असेही मुकेश सिंहच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. पण तुरुंगात अत्याचार करण्यात आले या आधारावर राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळण्याला आव्हान दिले जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. न्या. अशोक भूषण आणि न्या. ए एस बोपण्णा यांचाही या खंडपीठामध्ये समावेश आहे.

पुण्यात पिसोळीमध्ये भीषण आग, फर्निचर गोडाऊन भस्मसात

आपल्या दया याचिकेवर वेगाने निर्णय घेण्यात आला नाही, हा युक्तिवादही न्यायालयात फेटाळण्यात आला. मुकेश सिंह याच्या दया याचिकेवर सर्वात कमी कालावधीत निर्णय घेण्यात आला, असा युक्तिवाद सरकारी पक्षाकडून यावेळी करण्यात आला.