पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हाडवैरातून कारवाई, फाशीच्या शिक्षेनंतर मुशर्रफ यांचा आरोप

पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ

पाकिस्तानचे माजी अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या विशेष न्यायालयानं मंगळवारी फाशीची शिक्षा सुनावली.  हा न्याय नसून ती केवळ हाडवैरातून सुनावली गेलेली शिक्षा असल्याची पहिली प्रतिक्रिया मुशर्रफ यांनी दिली आहे.

मुशर्रफ यांच्या पार्टीकडून एक व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यात त्यांनी व्यक्तीगत वादातून शिक्षा सुनावल्याचा आरोप केला आहे. ते उच्च पदावर असून आता ते पदाचा गैरवापर करत आहेत, असा आरोप त्या व्यक्तीचं नाव न घेता मुशर्रफ  यांनी केला आहे. 

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम्प यांच्याविरोधात महाभियोग

संबधीत लोकांना माझा राग आहे आणि याच वैरातून मला लक्ष्य केलं जात आहे.  मला किंवा माझ्या वकिलांना बाजू मांडण्याची संधीही देण्यात आली नाही, किंबहुना असं उदाहरण मी कुठेही पाहिलं नाही, असा आरोपही त्यांनी केला आहे.  

मुशर्रफ हे पाकिस्तानच्या इतिहासात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले पहिले लष्करशहा ठरले. दरम्यान उपचारांसाठी २०१६ मध्ये मुशर्रफ   दुबईला गेले ते अद्यापही परतले नाहीत त्यामुळे या शिक्षेच्या अंमलबजावणीर प्रश्नचिन्ह आहे. 

पुलावरून कार पडली ट्रॅकवर, चालक जखमी