पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

निवडणूक आयुक्तांचे प्रणव मुखर्जींकडून कौतुक

प्रणव मुखर्जी

विरोधकांकडून निवडणूक आयोगाच्या कारभारावर टीका केली जात असतानाच माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आयोगाच्या कामकाजाचे कौतुक केले आहे. निवडणूक आयोगाने देशात अत्यंत योग्य पद्धतीने लोकसभा निवडणुकीचे नियोजन आणि अंमलबजावणी केली. लोकशाही व्यवस्थेच्या यशामध्ये योग्य पद्धतीने निवडणुकीचे नियोजन करण्याचे महत्त्व जास्त असते, असे प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे.

एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात प्रणव मुखर्जी म्हणाले, लोकशाही व्यवस्था यशस्वी ठरण्यामध्ये निवडणुकीचे योग्य पद्धतीने नियोजन करून त्या पार पाडणाऱ्या निवडणूक आयुक्तांची भूमिका महत्त्वाची आहे. यामध्ये अगदी सुकूमार सेन यांच्यापासून सध्याच्या निवडणूक आयुक्तांपर्यंत सर्वांचाच समावेश होतो. 

EVM आणि VVPAT यातील मते जुळली नाही तर काय?, विरोधकांचा निवडणूक आयोगाला सवाल

लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयुक्तांवर टीका करता येणार नाही. त्यांनी अत्यंत योग्य पद्धतीने निवडणूक कार्यक्रम राबविला आहे, असे प्रणव मुखर्जी यांनी म्हटले आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या काळात सध्याच्या निवडणूक आयुक्तांवर विरोधकांनी टीका केली होती. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याच्या तक्रारींवर आयोगाने लवकर निर्णय घेतले नाहीत, असा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. त्याचबरोबर काही विरोधी पक्षांनी निवडणूक आयोग भाजपच्या बाजूने निर्णय देत असल्याचा आरोप केला होता.