पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पाकसाठी बिगरमुस्लिम करतात सर्वाधिक गुप्तहेरीः दिग्विजय सिंह

दिग्विजय सिंह

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हे पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी मुसलमानांपेक्षा जास्त बिगर मुसलमान गुप्तहेरी करत असल्याचे म्हटले आहे. जे लोक आयएसआयकडून पैसे घेतात, तेच भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनही पैसे घेतात, असा आरोपही त्यांनी केला. यावर भाजपचे नेते शिवराज सिंह यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर टीका केली आहे. चर्चेत राहण्यासाठी दिग्विजय सिंह अशा प्रकारची वक्तव्ये करत असल्याचे त्यांनी म्हटले. पण नंतर दिग्विजय सिंह यांनी टि्वट करुन आयएसआयकडून पैसे घेऊन पाकिस्तानसाठी गुप्तहेरी केले जाते हा भाजपवर आरोप नव्हता असे स्पष्टीकरण दिले. 

मध्य प्रदेशमधील भिंड येथे माध्यमांशी बोलताना दिग्विजय सिंह म्हणाले की, जितकेही पाकिस्तानसाठी गुप्तहेरी करताना सापडले आहेत, ते लोक बजरंग दल, भाजप आणि आयएसआयकडून पैसे घेत आहेत. आयएसआयसाठी गुप्तहेरी मुसलमान कमी करतात आणि बिगर-मुसलमान जास्त करतात. हेही समजून घ्या.

आमची विचारधारेची लढाई भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आहे. ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग खेतला नाही त्यांनी आम्हाला राष्ट्रीयत्वाचे धडे देऊ नयेत. अशा विचारांशी आमची लढाई आहे. १९४७ पूर्वी हे लोक कुठे होते. जेव्हा इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते, तेव्हा हे लोक कुठे होते. त्यामुळे त्यांनी आम्हाल धडा शिकवण्याची भाषा करु नये, असेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, शिवराज सिंह चौहान यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर निशाणा साधला. चर्चेत राहण्यासाठी ते नेहमी वादग्रस्त विधान करता. ते आणि त्यांचे नेत पाकिस्तानची भाषा बोलतात. पाकिस्तान राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा हवाला देतात. भाजप-आरएसएसच्या देशभक्तीबाबत संपूर्ण जग आणि देशाला विश्वास आहे, असे त्यांनी म्हटले.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:People Spying For Pakistan Taking Money From Bjp And Bajrang Dal Says Congress Leader Digvijay Singh in mp