पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'नरेंद्र मोदी आणि आदित्यनाथ यांच्याविरोधात घोषणा देणाऱ्यांना जिवंत गाडू'

रघुराज सिंग

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध घोषणा देणाऱ्यांना जिवंत गाडले जाईल, असे खळबळजनक वक्तव्य भाजपचे उत्तर प्रदेशमधील नेते रघुराज सिंग यांनी केले आहे. रविवारी अलिगढमध्ये सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ आणि याबद्दल जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या एका मोर्चावेळी रघुराज सिंग यांनी हे वक्तव्य केले. 

JNU तील त्या दिवशीचा सर्व डेटा जपून ठेवा, हायकोर्टाचे ऍपल, गुगलला आदेश

रघुराज सिंग म्हणाले, काही मूठभर लोक पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणा देताहेत. त्यापैकी अनेक जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. तुम्ही जर मुर्दाबादच्या घोषणा देणार असाल, तर मी तुम्हाला जिवंत गाडून टाकेन. जे लोक दाऊद इब्राहिमकडून पैसे घेऊन आमच्या अधिकाऱ्यांना त्रास देण्याचे काम करीत आहेत. त्यांना धडा शिकवला जाईल. 

कांगारुंच्या शिकारीसाठी या ११ वाघांना मिळू शकते संधी

विरोधकांच्या अशा वागण्यामुळे आणि कृतीमुळे नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ अस्वस्थ होणार नाहीत. त्यांना आवश्यक वाटेल त्याच पद्धतीने ते देश चालवतील, असेही त्यांनी म्हटले आहे. रघुराज सिंग हे स्वतः अलिगढमधील आहेत. अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे.